Ad will apear here
Next
नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड
विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती
डॉ. नीलम गोऱ्हेमुंबई : शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. गोऱ्हे या विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत.

काँग्रेस पक्षाने उपसभापतिपदावरील दावा सोडल्याने आणि आरपीआयचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे गोऱ्हे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे १७ जुलै २०१८पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने या पदावर दावा केला होता. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून बाहेर पडल्याने त्यांच्या जागी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित केले. मात्र, उपसभापतिपदाचा दावा केल्यास विरोधी पक्षनेतेपद देणार नाही, असा पवित्रा शिवसेना-भाजप युतीने घेतल्याने काँग्रेसची कोंडी झाली. त्यामुळे नाईलाजाने काँग्रेसने उपसभापतिपदावरचा हक्क सोडला; तसेच आरपीआयचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे सोमवारी, २४ जून रोजी नीलम गोऱ्हे यांची या पदी बिनविरोध निवड झाली.  

विधान परिषदेच्या उपसभापतींची आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीची घोषणा एकाच दिवशी करण्यात आली. विधानसभेत हरिभाऊ बागडे यांनी वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसने वडेट्टीवार यांना पाठिंबा दिला. यानंतर थोड्याच वेळात विधान परिषदेमध्ये सभापती रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, काँग्रेसचे १६, भाजपचे २३, शिवसेनेचे १२, लोकभारती, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येकी एक तर, सहा अपक्ष आमदार आहेत. 

नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या असून, शिवसेनेची पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. २००२पासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचे  प्रतिनिधित्व करत आहेत. आतापर्यंत तीन वेळा त्या विधान परिषदेवर निवडून गेल्या आहेत. शिवसेनेतील एक अभ्यासू महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख असून, राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने आवाज उठवत असतात. राज्य सरकारच्या विशेष हक्क समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. आता विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती बनण्याचा मान डॉ. गोऱ्हे यांना मिळाला आहे.  

डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून निवड झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेना नेते सुभाष देसाई आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZJXCB
Similar Posts
‘जगातील मजबूत सैन्यांमध्ये भारतीय सैन्य आणि देश’ मुंबई : ‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख प्रत्युत्तर ही अभिमानाची बाब आहे. भारताच्या हवाईदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहमदच्या तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले आहेत. जगातील मजबूत सैन्य आणि देशांपैकी भारत एक देश असल्याचे सैन्याने सिद्ध केले आहे,’ अशा शब्दात महाराष्ट्राचे
शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत. महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे. शिवसेना आणि भाजप
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची वॉर-रूम कार्यान्वित पुणे : ‘विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी वॉर-रूम कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टीम पोचणार असून, आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे,’ अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी रविवारी (८ सप्टेंबर) पत्रकारपरिषदेत दिली
ठाणे, मीरा-भाईंदर उपनगरे मेट्रोने मुंबईला जोडणार ठाणे : नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई मेट्रो मार्ग-१०च्या ठाणे गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड या मार्गावर मेट्रो प्रकल्प अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात ठाणे, मीरा-भाईंदर व मुंबई शहरातील मेट्रो एकमेकांना जोडल्या जाणार असून, मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. ठाणे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language